,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांनाच जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणीं बदल्यांच्या तसेच नियकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे, तसेच बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित मागण्या विषयी जिल्हा प्रशासना च्या उदासीन धोरना मुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणा विरोधात प्रस्तावित अन्याय कारक बदल्या रद्द करण्यासाठी व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपुर , जिल्हा बुलढाणा यांनी पटवारी संघ चे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात १६ जुलै ला जिल्हा प्रशासन ला आंदोलनाची नोटीस दिली आहे.
प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावे, प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदांसाठी तलाठी/मंडळ अधिकारी यांना खात्याअंतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी, या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून दिनांक १८ जुलै रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणे, २३जुलै रोजी प्रत्येक तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणे, २५जुलै ल जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणे,२६ जुलै रोजी डी एस सी तहसिल कार्यालयात जमा करणे, व २९ जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे, अशी आंदोलनाची रूपरेषा ठरली आहे.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना विदर्भ पटवारी संघ, बुलढाणा चे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे, मंडळ अधिकारी संघटना, बुलढाणा चे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत सातपुते, मंडळ अधिकारी संघटना चे जिल्हा सचिव अशोक शेळके, विदर्भ पटवारी संघ चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भिसे, जिल्हा सचिव शिवानंद वाकदकर, जिल्हा सहसचिव संजय डुकरे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष राठोड व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.