लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या व विद्यापीठापासुन लांब असलेल्या चिमूर तालुक्यातील आणि परिसरातील विद्यार्थींच्या व महाविद्यालयाच्या सोई करिता विद्यापीठचे सुविधा केंद्र चिमूर येथे स्थापन करावे असा प्रस्ताव यंग टीचर्सचे सचिव असलेले गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोर्लावार यांनी दि.१७जाने. २०२३ च्या पहिल्याच सिनेट मध्ये सादर केला होता.त्याला अधिसभेने मान्यता दिलेली होती. परंतु दिड वर्ष उलटून ही विद्यापीठाने चिमूर येथे सुविधा केंद्र निर्माण न केल्याने दि. २०जून २०२४ला मा.आमदार श्री सुधाकर अडबाले सर यांच्या पुढाकाराने पुन्हा विषय लावण्यात आला त्यानंतर विद्यापीठाने यावर तात्काळ कारवाई घेत दि.२९/०६/२०२४ ला चिमूर येथे सुविधा केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या आधी देखील यंग टीचर्स असोसिएशनच्या पुढाकाराने अहेरी येथे विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
निश्चितपणे यांचा फायदा परिसरातील विद्यार्थी महाविद्यालयांना होईल.
संघटनेच्या मागणीला विद्यापीठांने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मा.कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, मा.प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, मा. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे आभार व अभिनंदन करण्यात येत आहे.