By : Rajendra Mardane
वरोरा : खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, खेळाडूंना खेळाची मुलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच त्यांना आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा, या उद्देशाने कर्मवीर विद्यालय व एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटर, वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कर्मवीर विद्यालयाच्या पटांगणावर २२ एप्रिल ते १८ में २०२४ या कालावधीत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कडक उन्हापासून वाचविण्यासाठी २२ एप्रिल २०२४ ते १८ मे २०२४ पर्यंत सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत खेळाडूंसाठी खास आयोजित उन्हाळी क्रीडा व योग प्रशिक्षण शिबिराचा समारोप एअर बोर्न ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष अमन टेमुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.
समारोपीय कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक ना.गो.थुटे, माजी सैनिक सुरेश बोभाटे, कर्मवीर शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र बोरीकर, कृष्णाजी खानेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या २८ दिवसीय शिबिरात मैदानावरील वैयक्तिक, सांघिक खेळ (तायक्वांडो,फेन्सींग, लाठी, कबड्डी, डान्स,योगा, व्हॉलिबॉल ) इ.दी खेळाचा समावेश होता. सर्व सहभागींना सकाळी पौष्टीक आहार देण्यात येत होता.
या उन्हाळी क्रिडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी जवळपास १२२ मुलामुलींनी हसत खेळत शिबिराचा मनमुराद आनंद लुटला. समारोपीय दिवशी मुलांनी प्रात्यक्षिक सादर केली.
शिबिरात विविध प्रशिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना अनमोल प्रशिक्षण देऊन आजच्या व्यस्त जीवनात खेळाचे महत्त्व समजावून दिले. यावेळी एअरबॉर्न ट्रेनिंग सेंटरचे सचिव तथा माजी सैनिक सागर कोहळे, उपाध्यक्ष हर्षदा कोहळे, माजी सैनिक सुरेश बोभाटे, माजी सैनिक ऋषी मडावी, अशोक वर्मा, अनिल चौधरी, मुख्य प्रशिक्षक सचिन बोधाने यांचे अमुल्य सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आकाश भोयर, गोसाई रामटेके अक्षय हनमंते, प्रणय मलोकार, दिव्या नंदनवार , निशा दास, गणेश पुरी, आदर्श मुंगले, कर्मवीर विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शिरिष दडमल, मनीषा वैद्य, प्राची दाते, विश्रृती आवारी, नंदकिशोर मसराम, मेघश्याम किन्नाके, विठ्ठल आत्राम आदींनी परिश्रम घेतले.
समापन कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालकवर्ग व गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.