लोकदर्शन प्रतिनिधी स्👉नेहा उत्तम मडावी
गोंडर – अशोक रामचंद्र कुबडे
प्रकाशन – इसाप प्रकाशन किंमत -४५०नुकतीच अशोक कुबडे लिखित गोंडर ही कांदबरी वाचण्यात आली सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने माझ्यातल्या साहित्यिकाने साहित्यकरास सांद घातली एक भाकर तीन चुली , वांझ , आणि आता गोंडर कांदबरी वाचली वाचल्यानंतर कांदबरीलेखनाची परंपरा फार जुनी आहे असून रा .रं. बोराडे , विभावरी शिरूरकर , अण्णाभाऊसाठे , आनंद यादव व्यंकटेश माडगूळकर यांच्या वाचनाचा प्रभाव गोंडर कांदबरीत दिसतोपरिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकांनी कांदबरी वाचली पाहिजे डॉ बाबासाहेबांनी समतेचा धडा दिला महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित झालेला कांदबरीचा नायक यशवंत , नायिका उमा यांची अलगद फुलत जाणारी प्रेमकथा , प्रस्थापित समाजाकडून वंचित समाजाचे कसे शोषण होते ग्रामीण परंपरा , चालीरिती , कशा पाळल्या जातात गावगाड्यातील वारीक समाजाचे प्रश्न , ज्वलंतपणे मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे जाचक . चालीरितीच्या जोखडात अडकलेला समाज , त्यांची बंधने परंपरा रूढी यांचा होणारा त्रास , भोग व्यक्त होतात ” भारतात लोकशाही असून जर जातीयता असेल , तर ही कुठली लोकशाही ?असा खडा सवाल नामदेव ढसाळ विचारतात महात्मा ज्योतिबा फुले यांनी ” शिक्षण हे परिवर्तनाचे हत्यार आहे अशी शिक्षणाची व्याख्या केली होती कथेतील संवाद , देहबोली , प्रसंग , रंजक आणि तेवढीच ताकदीचे ठरले असून
कांदबरीचा अंत फारच प्रेरणादाक समाजाला किंबहुना देशाला सामाजिक संदेश देणारा वाटतो तो प्रसंग असा” मी तुला आधार देणार आहे आणि तुझ्यासोबत परिवर्तनाची , सत्याची आणि अस्तित्वाची लढाई लढण्याचा विचार देणाऱ्या महात्मा फुलेंकडे पाहत दोघांनी एकमेकांना वचन दिलं ” महात्मा फुले यांच्या समता बंधुता आणि मानवतावादी विचारांना ही कादंबरी लेखकाने अर्पण केलेली आहे. तर महात्मा फुले यांच्या तेजस्वी परिवर्तनवादी विचारांवर ही कादंबरी समाप्त होते.. त्यामुळे कादंबरीचे दोन्हीही टोक अगदी भारदस्त झाले आहेत. एकंदर कादंबरीच्या सर्व मांडणीत लेखकाने आपले कसब समर्थपणे आणि कुशलतेने मांडले आहेत. कादंबरीतील अनेक प्रसंग हे रंजक असून वास्तवासी जोडलेले आहेत. वेळप्रसंगी वाचकाला अस्वस्थ करून सोडणारे संवाद वाचकांच्या मनाची घालमेल वाढवतात आणि उत्सुकताच टिकून ठेवतात.. अशी ही सर्वच अंगांनी सकस असलेली गोंडर कादंबरी सर्वांनी वाचावी आणि आपल्या संग्रही ठेवावी अशीच आहे.