By : Shankar Tadas
सिंदेवाही : सरपंच व सचिवांनी संयुक्तरित्या इच्छाशक्ती ठेवून ग्रामविकासासाठी कार्य केल्यास गावाचा विकास होऊ शकतो. मात्र दोघांत समन्वयाचा अभाव असल्यास ग्रामविकास बाधा पोहोचू शकते. कारण सरपंच व सचिव हे ग्रामविकासाच्या रथाची दोन चाके असल्याचे प्रतिपादन प्रा. आशिष देरकर यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांतील ग्रामसेवकांचे प्रशिक्षण सुरू आहे. मंगळवारी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांना ट्रेनिंगमध्ये व्याख्यानाकरिता आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ते व्याख्याता म्हणून बोलत होते. मंचावर प्रशिक्षण केंद्राचे सत्र संचालक तथा संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरवळे, विस्तार अधिकारी बंडू गुंटीवार, मनिषा नागलवाडे, स्मार्ट ग्राम बिबी येथील ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे व चारही जिल्ह्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.