लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर -राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलाबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे स्कूल कनेक्ट भाग दोन या संपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत कोरपणा व जिवती तालुक्यातील जूनियर कॉलेजमधील मुख्याध्यापक व प्राचार्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह व तज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाच्या विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे आणि गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद पोकळे हे प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी तज्ञ मार्गदर्शक डॉ. अनिल चिताडे यांनी शैक्षणिक धोरण 2020 मुळे होणाऱ्या शैक्षणिक बदलाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवधिस्थित, बहुविद्याशाखीय व लवचिक अभ्यासक्रमाविषयी त्याचप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेली कल्पक, व्यावसायिक व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाबद्दल विशेष माहिती दिली यावेळी डॉ. चीताडे यांनी मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती व त्यामुळे आलेली लवचिकता सविस्तरपणे समजून सांगितली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय कुमार सिंह यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे असल्याचे सांगितले त्याचबरोबर या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रथम वर्षासाठी करण्यासंबंधी सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे झालेल्या बदलाची सविस्तर माहिती दिली यावेळी गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद पोकळे यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे यांनी दिली तर आभार डॉ.शरद बेलोरकर यांनी मानले. यावेळी कोरपणा व जिवती तालुक्यातील बहुसंख्य जुनियर कॉलेजमधील प्राचार्य तथा मुख्याध्यापक तसेच शरदराव पवार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते स्नेह भोजनाने या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला