जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सिंदखेडराजा येथे भेट देऊन घेतला निवडणूकीचा आढावा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 18 एप्रिल आणि 19 एप्रिल 2024 रोजी ई. व्ही. एम. आणि व्ही. व्ही. पॅट मशीन सिलिंग करण्याचे काम आज संपन्न झाले.

मा.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 05 बुलडाणा लोकसभा मतदार संघ श्री. किरण पाटील यांनी आज 24 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघ येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान यंत्र सिलिंग केंद्राला आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी भेट दिली.

आजच्या या भेटीदरम्यान मा. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. किरण पाटील यांनी सिंदखेड राजा येथील ई. व्ही. एम. सिलिंगच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच महत्वपूर्वक मार्गदर्शक केले.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे, बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदाराची नोंद झाली असून, दिनांक 26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच्या साठीची लागणारी तयारीबाबतचा आढावा मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. किरण पाटील यांनी घेतली.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये एकूण 336 मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण 336 मतदान यंत्र (CU) सिलिंग करण्यात आले, 336 मतदान केंद्राकरिता एकूण 672 बॅलेट युनिट (BU) सिलिंग करण्यात आले तसेच 336 व्ही. व्ही. पॅट मशीन सिलिंग करून सज्ज करण्यात आले.

त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानादिवशी काही अडचण उद्भवल्यास राखीव मध्ये 72 मतदान यंत्र (CU), 144 बॅलेट युनिट (BU), 36 व्ही. व्ही. पॅट मशीन सिलिंग करून सज्ज करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे एकूण मतदान यंत्रापैकी 18 मतदान यंत्रावर प्रारूप स्वरूपात 1000 प्रमाणे मतदान नोंदवून मतदान यंत्र सुस्थितीत असून मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याची खातरजमा करण्यात आली. सर्वच मतदान यंत्रावरती प्रारूप मतदान घेतल्यानंतर ते सुस्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच मतदान यंत्र सिलिंग करण्यात आले आहे.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री किरण पाटील यांनी सिंदखेडराजा येथील ई. व्ही. एम. सुरक्षा कक्षाला (strong Room) ला भेट देली तसेच सर्व व्यवस्थाची पाहणी करून कशाप्रकारे ई. व्ही. एम. ला सुरक्षा प्रदान केली जात आहे याची खातरजमा करून घेतली तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारी संबंधी समाधान व्यक्त केले.

कालपासून सुरु असलेल्या या ई.व्ही.एम. आणि व्ही. व्ही. पॅट मशीनचे सिलिंगचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने मागील दोन दिवसापासून युद्धपातळीवर काम केले आणि ई. व्ही. एम. आणि व्ही. व्ही. पॅट सिलिंग ची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनीषा कदम, मा. तहसीलदार सिंदखेडराजा श्री. प्रवीण धानोरकर, मा. तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती वैशाली डोंगरजाळ, मा. नायब तहसीलदार श्री. मनोज सातव, मा. नायब तहसीलदार श्रीमती डॉ.अस्मा मुजावर, मा. गटविकास अधिकारी सिंदखेडराजा श्री. डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, मा. गटविकास अधिकारी देऊळगांव राजा श्री. मुकेश महोर ,मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री प्रशांत व्हटकर, मा. मुख्याधिकारी देऊळगावराजा श्री. अरुण मोकळ, मा. नायब तहसीलदार श्री. नितीन बढे, मा. नायब तहसीलदार श्रीमती प्रांजल पवार, प्रसार माध्यम नोडल अधिकारी श्री. अंकुश म्हस्के, उमेश गरकळ, प्रकाश शिंदे, संजय सोनुने तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग या सर्वांनी प्रयत्न केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *