*श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान तर्फे महाकाली भक्तांकरिता पानपोई चे उदघाटन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

शहराचे ग्रामदैवत आराध्य माता महाकालीची यात्रा रामनवमी पासून सुरु होईल त्या निमित्ताने आध्रप्रदेश तथा महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यातून भाविकांची गर्दि सुरु होईल. याच अनुषंगाने शहरातील धार्मीक संस्था तर्फे संपूर्ण यात्राभर अन्नदान सुरु होत असते परतू या रखरखत्या उन्हात त्यांना शुद्ध आणि थंड पीन्याच्या पाण्याची व्यवस्था कुनाच कडून होत नसल्याचे निदर्शनास आल्याने श्री साईसेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर तर्फ गत सहा वर्षापासून मंदिरा समोर माता महाकालीच्या भक्तांकरीता शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणी कॅन च्या माध्यमातून उन्हाळाभर “पाणपाई” या रुपात करीत असते . या वर्षीच्या पाणपोई चा शुभारंभ प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडव्याच्या पावण परवावर करण्यात आला. या उदघाटन प्रसंगी सौ बबिता अग्रवाल, समाजसेवीका , सौ जिग्ना पटेल, पटेल, सौ नम्रता पेटल, प्रतिष्ठीत नागरिक, अॅड आशिष मुंधडा समाजसेवक,क सचिन गाटकिने, अध्यक्ष साई सेवासंकल्प प्रतिष्ठान उपस्थीत होते. उपस्थितांनी मार्गदशण करुण सहकार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले. 10 एप्रिल पासून ते यात्रेच्या समाप्ती पर्यंत प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यातर्फे पाणपोईला श्रमदान करून चालविण्यात येणार आहे.

पाणपोईच्या उद्‌घाटन करीता व सेवकार्यकिरीत सचिव प्रमोद वरभे , कोषाध्यक्षा सौ ममता दादूरवाडे, विनोद गोवारदिपे , सचिन बरबटकर, पंकज निमजे, सुरेश सातपुते, भागवत खटी , प्रकाश नांढा , देवेंद्र लांजे, रुपेश महाडोळे , नेमराज पोडे, दत्तात्रय झूलकंटीवार, चंदू रणदिवे, डॉ. नंदकिशोर मैदळकर, महेंद्र झिलपे, दिगरज पेंढारकर, सक्षम रणदिवे,आशा यादव, सौ पूनम नवले, सौ इंद्रायणी गाटकिणे , यांची सहकार्य लाभले होती सचालण ममता दादूरवाडे यांणी’ तर आभार आशा यादव यांनी व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *