लोकदर्शन 👉गुरुनाथ तिरपनकर
बदलापूर दिनांक : २एप्रिल
जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय *राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार* प्रदान करून त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्वाचा सत्कार महाराष्ट्रातील एकमेव आणि प्रसिद्ध असलेल्या बदलापूर येथील *माहेर वाशिन* संस्थेच्या प्रांगणात करण्यात आला.
जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा संपादक श्री गुरुनाथ तिरपणकर आणि संस्थेच्या संचालक मंडळाकडून वर्षभर सामाजिक उपक्रम सुरू असतात त्यामधीलच हा एक सुंदर कार्यक्रम काल संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वीरांगना ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा उमा सिंह, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारातील गोल्ड मेडलिस्ट निता विजय बोरसे, माहेर वाशिणच्या संस्थापिका प्रतिभाताई शिर्के, सामाजिक व शैक्षणिक समाजसेविका आरती बनसोडे, एंटिपायरसी सेल मुंबईचे मुख्य तपाशी अधिकारी श्री रामजीत महादेव गुप्ता आणि सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा महानगर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमितकुमार गोईलकर हे उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी या निमित्ताने उपस्थित सत्कारमूर्ती महिला आणि जनसमुदायाला मार्गदर्शन केले. आयुष्यातील अडीअडचणी पार करून यशाची शिखरे पार करणाऱ्या महिलांच्या कार्याचा दाखला देत आरती बनसोडे यांनी उपस्थित महिलांच्या आत्मविश्वासाला आणखी बळ दिले.
त्यानंतर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचा 3 रा वर्धापन दिन नुकताच पार पडला या 3 वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचिता भंडारी, गंधाली तिरपणकर, तेजल उकार्डे, सचिन भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार श्री दत्ता कडुलकर यांनी केले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.