लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये एकमेव असे पर्यटन केंद्र आहे. जिथे निसर्गाचे सौंदर्य लाभले असून जिल्ह्यातून नागरिक विरंगुळा करण्याकरिता येतात. अंमलनला प्रकल्प माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असून त्यासाठी पुढेही मोठ्या प्रमाणात निधी देऊन सर्वोत्तम पिकनिक स्पॉट बनवण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे स्थित प्रसिद्ध अंमलनाला परिसरात ७.५० कोटी रुपये खर्चून अंमलनाला पर्यटन केंद्र साकारण्यात आले. यामध्ये बगीच्या, बोटिंग स्विमिंग यासह अनेक अनेक गोष्टींचा पर्यटकांना लाभ घेता येणार आहे. या पर्यटन केंद्राचे लोकार्पण आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.
याप्रसंगी गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम, कार्यकारी अभियंता वराडे, कनिष्ठ अभियंता सय्यद, माजी जि.प. सदस्य नानाजी आदे, जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील उपसरपंच प्रा. आशिष देरकर, नगरसेवक विक्रम येरणे, अरविंद मेश्राम, राहुल उमरे, सागर ठाकुरवार, मीनाक्षी एकरे, अश्विनी कांबळे, किरण अहिरकर, सुनिता कोडापे, विकास भोजेकर, राहुल बोढे, रामचंद्र सोनपितरे, रोहित शिंगाडे, प्रणित अहिरकर, गणेश वनकर, दीप्ती तेलंग, भारत पवार यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.