By : Ajay Gayakwad
वाशिम :
रिसोड तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचे रिठद, आसेगावपेन, चिखली या 33 के.व्हि उपकेंद्राकरिता ११ केवी च्या लिंक लाईन वरुन सर्व ग्राहकांना वीज मिळते पैकी रिठद व आसेगावपेन या 33 के.व्हि. उपकेंद्राकरिता वाशिम जिल्ह्यात मालेगाव येथून १३२ के.व्हि.वरुन लिंकलाईन रिठद येथे आहे. हि विद्युत वाहिनी १९६५-६६ सालापासून उभी असून जवळपास ४० किलोमीटर शेतानेच ही लिंक लाईन असून या लिंक लाईन मध्ये फॉल्ट झाल्यास दुरुस्तीसाठी दहा ते पंधरा तास लागतात. पावसाळ्यात किती तास लागतात हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे हे अडथळे येऊ नये म्हणून रिसोड तालुक्यातील चिखली (कवठा)विद्युत उपकेंन्द्रापर्यंत रिसोड वरून लिंक लाईन आहे. आसेगावपेन विद्युत उपकेंद्राकरिता रिठदवरून लिंकलाईन आहे. आसेगावपेन ते चिखली(कवठा) दरम्यान केवळ पाच किलोमीटरची (११) 33 के.व्ही.नवीन लिंकलाईनच उभी करावी लागते.यासाठी अधिक्षक अभियंता शिंदे,आणी कार्यकारी अभियंता चव्हाण, विद्युत वितरण कंपनी वाशिम यांना आज दिनांक ११/३/२०२३ ला शिवसेना रिसोड तालुकाप्रमुख नारायण आरू यांचे माध्यमातून निवेदन देण्यात आले. होणाऱ्या नवीन लिंक लाईनचा फायदा सर्व गावातील ग्राहकांना व शेतीचे ग्राहक यांनाच होणार असून या निवेदनाची दखल लवकरच घेतील व ग्राहकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा नारायण आरु यांनी व्यक्त केली.