लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत
विदर्भ महाविद्यालय जिवती, येथे बौद्धिक संपदा अधिकार (आय पी आर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचा IQAC विभाग,पेटंट ऑफिस – भारत सरकार, असोचॅम, नवी दिल्ली आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम एस एम ई) मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. शरद उसनाळे, लातूर यांनी विविध प्रकारचे बौद्धिक संपदा अधिकार, त्यांचा वापर आणि फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. कॉपीराईट, पेटंट, भौगोलिक संपदा अधिकार (जी आय), व्यापार चिन्ह (ट्रेडमार्क) आणि औद्योगिक रचना अधिकार (इंडस्ट्रियल डिझाइन) आणि त्यामधील फरक याबद्दल ते बोलले. विविध प्रकारच्या संशोधनाचे पेटंट कसे प्राप्त करावे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमध्ये जिवती तालुक्यातील शिक्षक, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.एस . एच.शाक्य होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजयकुमार देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश दुर्योधन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश कदम यांनी केले.