वन्यजीव छायाचित्रकार देवानंद साखरकर सन्मानित

लोकदर्शन

चंद्रपूर :

मागील वीस वर्षात काढलेल्या वन्यजीव छायाचित्रातील योगदानाबद्दल चंद्रपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर यांना सन्मानित करण्यात आले.

ताडोबा महोत्सवातील समारोपीय कार्यक्रमांमध्ये चंद्रपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व इतर मान्यवर यांच्या हस्ते साखरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्तराखंडचे वनमंत्री सुबोध उन्नीयाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उत्तराखंडचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुप मलिक, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीआयडी फेम शिवाजी साटम, उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *