By : Shankar Tadas
चंद्रपूर :
वेकोलि चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी व वणी क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विशेषत: उर्वरित जमिनीचे अधिग्रहण, कास्ट प्लस एग्रीमेंट धोपटाळा, भटाळी, पाटाळा व अन्य क्षेत्रातील नोकरी मान्यता व अन्य महत्वपुर्ण प्रलंबित प्रकरणांचा आढावा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे घेण्यात आला. जिल्हाधिकारी चंद्रपूर, वेकोलि सीएमडी, क्षेत्रीय महाप्रबंधक व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देत प्रलंबित सर्व प्रकरणे त्वरीत मार्गी लावण्याच्या बैठकीत सुचना केल्या.
सिध्दबली इस्पात प्रकल्पातील विविध प्रश्न, समस्या, कामगारांच्या अडचणी, प्रकल्पात होणारे अपघात व अन्य महत्वपुर्ण विषयांवर जिल्हा नियोजन भवन येथे आढावा बैठक घेवून समयोचित निर्देश दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, पुनर्वसन अधिकारी, अन्य विभागप्रमुख, माजी आमदार संजय धोटे, खुशाल बोंडे, तहसीलदार, कामगार अधिकारी, कंपनीचे गुप्ता, हेमराज देशमुख तसेच इतर अधिकारी, ॲड. प्रशांत घरोटे व कामगार बांधव उपस्थित होते. #chandrapur #LokSabha @NarendraModiAmitShah