by : Mohan Bharti
गडचांदूर:सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे दि. 27 फेब्रुवारीला कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान तसेच मराठी भाषेचे महत्व सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून शाळेने पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे,ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप यांनी सुद्धा मराठी भाषेची महती तसेच मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन नामदेव बाबनकर यांनी तर आभार जीवन आहे यांनी मानले. कार्यक्रमाला सुरेश पाटील, माधुरी उमरे, मरस्कोल्हे, मांढरे, वासेकर कोंगरे, मेश्राम, आत्राम, भुवनेश्वरी गोपमवार शशीकांत चन्ने, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.