लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत
जिवती :
महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे दिनांक 27 फेब्रुवारी थोर साहित्यिक कथाकार कादंबरीकार व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ” *मराठी भाषेत म्हणीचे महत्त्व*” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिनेश दुर्योधन प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. परवेज अली, डॉ. डोर्लिकर मॅडम, प्रा. शिंदे, प्रा. सदुलवार, प्रा. कदम हे उपस्थित होते. मराठी भाषेत गोडी निर्माण करण्याकरिता म्हणींचे फार महत्त्व आहेत. सदर म्हणी मुळे भाषेला लवचिकपणा येतो व ती शृंगारिक वाटू लागते. असे प्रतिपादन डॉ. दुर्योधन यांनी केले, तर मराठी भाषेचा इतिहास फार प्राचीन असून मराठी भाषा ही जोमाने समृद्ध व संपन्न होत आहे व ती आपल व्यापक अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. असे मत मुख्य मार्गदर्शक या स्थानावरून डॉ. परवेज अली यांनी मांडले तर मराठी भाषेचा महिमा हा फार थोर असून त्याला अजून समृद्ध करण्याकरिता समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तसेच प्रत्येकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा असे डॉ. डोर्लिकर व उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले. सदर कार्यक्रमात कुसुमाग्रज यांचा जीवनपट व त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा सर्व विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यात आला. तसेच त्यांनी रचलेल्या लोकप्रिय कवितांचे वाचन सुद्धा विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी केले. मराठी भाषा ही सदैव आदर्शवत होती आणि राहील अशी आशा या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत तर प्रास्ताविक डॉ. पानघाटे आणि आभार प्रा. लांडगे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.