by : Dharmendra Sherkure
वरोरा : राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला मिळावा, कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ पिक विमा, उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी चा लाभ देण्यात यावा व अन्य मागणीसाठी शेतकरी नेते किशोर डुकरे शेतकऱ्यांसह गेल्या तीन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर आमरण उपोषणाला बसले आहेत. याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे. यावर्षी अतिवृष्टी मुळे शेतीचे फार मोठे नुकसान चे झाले होते तसेच सोयाबीन पिकावर येलो मोझाक रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन नष्ट झाले होते. यात शेतकरी कमालीचे कर्जबाजारी झाले कारण सोयाबीन हे दसरा दिवाळी मध्ये हाती येणारे नगदी पीक आहे,तालुक्यातील भरपूर मोठ्या प्रमाणात खरीप हंगामाचा पिक विमा काढला परंतु विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी सहसकट पिक विमा आठ दिवसात देण्यात यावा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आठ दिवसात देण्यात यावी मराठा समाज सगेसोयरे बाबत आदेश रद्द करण्यात यावा ज्या शेतकऱ्यांच्या शेती नदी नाल्याला लागून आहे अशा शेतकऱ्यांना पूरबुडाई अनुदान देण्यात यावे जिल्ह्यामध्ये शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या जिनिंग व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यासाठी , किशोर डुकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतात व न्याय मिळवून देण्यात अग्रेसर आहे शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत , वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय देवतळे,ब़डु देउळकर , व विविध पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला,त्यांच्यासोबत चंद्रास मोरे, प्रवीण बदकी ,माणिक डुकरे, राहुल देठे संदीप वासेकर ,निखिल तिखट ,आदी शेतकरी बैलबंडीवर उपोषणाला बसले आहेत.