लोकदर्शन 👉प्रा.अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कुणाचे याबाबत काल निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आज शरद पवार गटांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्यांचा निकाल प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबत काल निकाल दिला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने हिरावून घेतले. आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन “देशाचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ” “गली गली मे शोर है अजित पवार चोर है ” अशा घोषणा देत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रमोद घोंगे,तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, बबन बुरकुल,जहीर खान,अजमत खान,शंकर वाघमारे,संभाजी मुजमुल,विजय पवार,मुबारक चाऊस,अमोल उदेपुरकर ,सचिन कोल्हे,भानदास कणखर,अनिस शाह,रावसाहेब गाडवे, आदी कार्यकर्त्यांनी सदर आंदोलनात सहभाग घेतला.