सामाजिक न्याय भवन (बार्टी) सोलापूरच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

 

लोकदर्शन प्रतिनिधी : राहुल  खरात

सोलापूर : सामाजिक न्याय भवन (बार्टी) च्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांना आदर्श फाउंडेशन संस्थेच्या वतीने आदर्श प्रशासकीय सेवा सन्मान, पर्सन ऑफ द इयर, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सर्वच क्षेत्रात भरारी घेतली आहे. महिला सक्षमपणे कर्तबगारी सिद्ध करीत आहेत.समाजाप्रती केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माझा सन्मान झाला याविषयी आनंद वाटतो. आदर्श फाउंडेशन संस्था विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचे काम करीत असून फाउंडेशनचे हे कार्य प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त करित त्यांनी पुढील कार्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन, शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृह येथे झालेल्या समारंभात कोल्हापुरी फेटा , सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र देऊन प्रणिता कांबळे यांचा गौरव करण्यात आला. उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख योजना पाटील (येलूर ) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशोगाथा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास शिरोळच्या माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे, राज्य कर निरीक्षक दिपाली लोहार,पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघटना अध्यक्ष प्रदीप माने पाटील,शाहू सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका रेखाताई पाटील ,सावर्डे बुद्रुक चे माजी सरपंच प्रताप पाटील , माजी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमन भगवानराव साळुंखे ,
अभिनेते डॉ दगडू माने ,निवेदिता शिंदे,हर्षवर्धन शिंदे,स्नेहल शिंदे, अमरसिंह शिंदे,शिल्पा महात्मे,अश्विनी माळी ,संजय भोसले, संजय काटे यांच्यासह आदर्श फाउंडेशनचे प्रमुख विजय लोहार,कार्यवाह वनिता लोहार आदि मान्यवर उपस्थित होते .प्रा गंगाराम सातपुते यांनी

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *