By : Shankar Tadas
कोरपना :
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दैवत असलेल्या भवानी माता मंदिराच्या बांधकामा करिता निधी मंजूर करण्याबाबत नारंडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनुताई वसंतराव ताजने यांच्या नेतृत्वात गावातील शिष्टमंडळाने दालमिया सिमेंट कंपनीकडे निवेदन सादर केले.
नारंडा गावामध्ये भवानी माता मंदिराचे अतिशय पुरातन मंदिर असून सदर मंदिराची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे गावातील भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, नारंडा गावातील भाविक मोठ्या प्रमाणात भवानी माता मंदिरात मातेचे दर्शन घेण्याकरिता जातात तसेच नवरात्रीमध्ये सुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी गर्दी असते त्यामुळे सदर मंदिराचे बांधकाम करण्याकरिता दालमिया सिमेंट कंपनीतर्फे निधी मंजूर करण्यात यावा याकरिता कंपनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सरपंच अनुताई ताजने यांच्या नेतृत्वात कंपनीचे एच.आर. हेड अभिषेक कुमार मिश्रा यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले उपसरपंच बाळा पावडे,युवा नेते आशिष ताजने,माजी सरपंच वसंता ताजने, पोलीस पाटील प्रा. नरेश परसुटकर,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष हिराजी पाटील वांढरे,देवस्थान कमिटीचे सचिव सदाशिव पाटील पोटदुखे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद ताकसांडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे व अजय तिखट उपस्थित होते