लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर – भारत हा युवकांचा देश असून युवकांवरच या देशाची धुरा आहे. त्यामुळे तो संस्कारी असणे अतिशय आवश्यक आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमधूनच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजत असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता व गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी केले. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर यांच्या वतीने तळोधी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल थिपे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून सरपंच ज्योती जेनेकर, संस्थेचे उपाध्यक्ष विकासभाऊ भोजेकर संस्थेचे सचिव धनंजय गोरे संचालक राहुल बोढे, संचालक रामचंद्र सोनपितरे, प्राचार्या स्मिता चिताडे, प्राचार्य शैलेंद्र देव, मुख्याध्यापक आर. बी. गावंडे, उपप्रचार्य प्रफुल्ल माहुरे, राजू गोखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले. संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच तळोधी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.