रनजीत यादव कोरपना चे नवे तहसीलदार

 

लोकदर्श 👉 मोहन.भारती

कोरपना – कोरपना येथील तहसील कार्यालयांच्या तहसीलदार म्हणून रंजीत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवा ( आय ए एस ) कॅडर चे अधिकारी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जिजामाता नगर कराड तर पदवीचे शिक्षण बी टेक राजारामबापू कॉलेज आफ टेक्नॉलॉजी सांगली येथे झाले आहे.त्यांचे मूळ गाव कडेगाव सांगली आहे. त्यांची कोरपना येथे प्रथमच नियुक्ती असून येथील तहसील कार्यालयाला प्रथमच आयएएस दर्जा असलेले अधिकारी तहसीलदार म्हणून लाभले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर कोरपना तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कामात गती आली आहे. पहिल्याच दिवशी रेती तस्करीवर धडक कारवाई करून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामालाही वेग आल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here