उरण व पनवेल गोशीन रियू कराटे विद्यार्थ्यांची मलेशियाला निवड.

.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि २१ नवीन पनवेल स्टार हॉटेल येथे गोशीन रियू कराटे असोसिएशन इंडिया तर्फे ३५ वी राष्ट्रीय स्पर्धा व ट्रेनिंग कॅम्प दिनांक १७,१८,१९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी बेंगलोर,चेन्नई,गुजरात,तामिळनाडू,रायगड ठाणे या राज्यातून व जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन शिहान वसंथन मलेशिया आणि सिंगापूर देशाचे कोच, साई शेठ, नगरसेवक अजय बहिरा, जितेंद्र शेठ फडके (लायन ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष ),सुशील म्हात्रे (लायन ग्रुप उरण अध्यक्ष )यांनी केले.विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन सिहान वसंथन (मलेशिया) व ओस्ट्रेलिया देश्याचे कोच यांनी केले. उरण व पनवेलच्या विद्यार्थ्यांनी कु्मिते व काता प्रकारात पदके पटकाविली.वेदिका वेहले एक सिल्वर एक ब्रांझ मेडल, सृष्टी सरोज ब्रांझ आणि सिल्वर मेडल, कार्तिकी पाटील एक सिल्वर एक ब्रांझ मेडल, प्रीषा भोईर दोन ब्रांझ मेडल, वेदा पाटील एक सिल्वर एक ब्रांझ मेडल, अद्या ठाकूर एक सिल्वर एक ब्रॉन्झ मेडल, निमेश पाटील एक सिल्वर मेडल, नैतिक गावंड एक सिल्वर एक ब्रांझ मेडल, आर्यन पाटील दोन ब्रांझ मेडल, नैतिक गावंड दोन सिल्वर मेडल, , निकिता कोळी एक सिल्वर एक ब्रॉन्झ मेडल, शितल गणेशकर दोन सिल्वर मेडल, वेदा ठाकरे एक सिल्वर एकब्रॉन्झ मेडल, हृद्वी म्हात्रे दोन ब्राझ मेडल, सोज्वल पावस्कर एक सिल्वर एक ब्रांझ मेडल, भार्गवी मोकल एक गोल्ड एक ब्रांझ मेडल, साक्षी पंडित एक गोल्ड एक ब्राँझ मेडल, नेत्रा गोल्ड आणि ब्राझ मेडल , आर्या गावंड दोन गोल्ड मेडल, वैदेही घरत एक गोल्ड एक ब्रांझ मेडल , स्वरा म्हात्रे एक गोल्ड मेडल, श्लोक ठाकूर दोन गोल्ड मेडल, पियुष ठाकूर एक गोल्ड एक ब्राँझ मेडल, अनिश पाटील एक गोल्ड एक सिल्वर मेडल, रोहित घरत एक गोल्ड मेडल, दोन गोल्ड मेडल, परेश पावसकर एक गोल्ड एक सिल्वर मेडल,सुजित पाटील गोल्ड मेडल,गोपाळ म्हात्रे गोल्ड मेडल अशी पदके पटकाविली.सदर विजयी उमेदवारांची निवड मलेशिया डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.यावेळी उपेंद्र माळी, रेश्मा माळी,विघ्नेश कोळी, निकिता कोली, शितल गणेशकर, सुलभा कोळी यांना फर्स्ट डीग्री ब्लॅक बेल्ट व राकेश म्हात्रे,परेश पावसकर विनय पाटील, अशोक वारली यांना सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.ही स्पर्धा सिंहान राजू कोळी इंडिया प्रेसिडेंट यांनी आयोजित केली होती. कृष्णा पाटील , आनंद खारकर, गोपाळ म्हात्रे, विनय पाटील, राकेश म्हात्रे, रेश्मा भूपेंद्र माळी, अंजा माने, परेश पावसकर, अमिता घरत, अमिषा घरत,सुजित पाटील, प्रियांका म्हात्रे, माधुरी म्हात्रे,किशोर म्हात्रे,गणेश म्हात्रे यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *