२१२३ रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबीराचा लाभ : अनेक दुर्धर आजारांवर होणार उपचार. ⭕आ. सुभाष धोटे मित्रपरिवार तर्फे भव्य आयोजन.

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर दिनांक 5 नोव्हेंबर — कोरपणा तालुका एक दुर्गम, आदिवासी बहुल आणि ग्रामीण तालुका असून या परिसरात अनेक दुर्धर आजाराने नागरिक त्रस्त आहेत मात्र महागडे उपचार परवडत नाहीत. आरोग्याच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचत असूनही अनेक नागरिक दुर्धर आजाराच्या उपचारापासुन वंचित असतात ही बाब ओळखून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे मित्रपरिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यामानाने वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) चे प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर व टिम ने आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज व्यवस्थेसह नागरिकांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या महाआरोग्य शिबीरात २१२३ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी दंत आजार, मुखाचे आजार, स्तनांचे कर्करोग व इतर आजार, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, अस्थिरोग, श्वसन रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, काचबिंदू आजार, कान, नाक, घसा, डोळ्यांचे आजार, पोटाचे विकार, शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर आणि तपासणी करणारे सुसज्ज वाहन, मॅमोग्राफी मशीन, तसेच विविध आजाराचे निदान करणारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होते. विविध आजारांची तपासणी करून रूग्णाना सावंगी मेघे येथे पाठविण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून कोरपणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, श्रीधरराव गोडे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संध्याताई पझ्झई, डॉ. प्रसाद देशमुख, डॉ. अभिषेक जोशी, एन. पी. शिंगणे, डॉ. देशमुख, डॉ. संदीप बांबोडे, प. स. चे माजी सभापती श्याम रणदिवे, कृ. उ. बा. समितीचे सभापती अशोक बावणे, भाऊराव कारेकर, अभिजित धोटे, यु. काँ. चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सुरेश मालेकर, संभा कोवे, सीताराम कोडापे, कोरपना च्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे, उपाध्यक्ष इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, सचिन भोयर, राजबाबु गलगट, भाऊराव चव्हाण, स्वप्नील टेंभे, गणेश गोडे, मनोहर चन्ने, राहुल मालेकर, संकेत जोगी, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, रोशन मरापे, प्रेम बोढे यासह काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *