पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते महाज्योती फ्री टॅब योजनेच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप ♦️ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुसचा उपक्रम

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते घुग्घुस येथील गांधी चौकातील कार्यक्रमात महाज्योती फ्री टॅब योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले.

इयत्ता १० वी वर्गाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाज्योती फ्री टॅब योजना सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले होते. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी विशेष परिश्रम घेऊन भरून घेतले होते.

आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या व पुढे विज्ञान शाखा घेऊन शिकण्याची तयारी असणाऱ्या (ओबीसी), (एसबीसी) व (एनटी) जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना फ्री टॅब व ६ जिबी रोज इंटरनेट डाटा नि:शुल्क पुरवण्यात येणार आहे.

जे विद्यार्थी सन-२०२३ मध्ये १० वी वर्गाची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र होते.

यावेळी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक आभास सिंग, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, ठाणेदार आसिफराजा शेख, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, साजन गोहणे, सिनू इसारप, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, राजेश मोरपाका, रामचंद्र चंदखेडे, शामसुंदर नायडू, सचिन कोंडावार, प्रवीण सोदारी, हसन शेख, मोमीन शेख, मधुकर मालेकर, संजय भोंगळे, प्रेमलाल पारधी, सागर तांड्रा, व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *