,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती च्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन शासन स्तरावरून करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या जायंटस वेल्फेअर फाउंडेशनच्या देऊळगाव राजा शाखेच्या परिवाराने शहरातील सिविल कॉलनी मधील श्री गणपती मंदिर परिसरात साफसफाई करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला व न प च्या घंटागाडी मध्ये जमा झालेला सुका व ओला कचरा याचे वर्गीकरण करून कंपोस्ट डेपोवर नेऊन टाकला यावेळी जायंटस चे एन सी एफ एडवोकेट पुरुषोत्तम धन्नावत यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केल्यास भारत देश फार लवकर सुजलाम सुफलाम होऊन आरोग्यासाठी साठी हे वरदान ठरणार आहे
याबाबत सविस्तर असे की स्वच्छता हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे स्वच्छता चा अर्थ म्हणजे स्वच्छ राहणे होय स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते प्रत्येक दिवशी आपण जसे उठतो तेव्हा रोज न चुकता दात घासले पाहिजेत आपला चेहरा हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत आणि सोबतच आंघोळ ही केली पाहिजे आणि हे सर्व स्वस्थ व शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी एक चांगली सवय आहे स्वच्छता आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे जितके आपल्यासाठी पाणी व जेवण कारण म्हटले जाते ना स्वच्छता जिथे नांदते तिथे देव वास करतो महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने जायंटस परिवाराने शहरातील सिविल कॉलनी मधील श्री गणपती मंदिर संपूर्ण परिसर स्वच्छ केला व नप च्या घंटागाडी द्वारे जमा झालेला कचरा कंपोस्ट डेपोवर नेऊन टाकला यावेळी जायंटस परिवाराचे पुरुषोत्तम धन्नावत, जुगल किशोर हरकुट, सन्मती जैन, संदिप जांभोरकर ,संजय सराफ, बाळू मिणासे, डी. के राठी, कमल किशोर मल्लावत, रमेश कायंदे ,संजय डोणगावकर ,अनिल जैन, ईश्वर टापर, अमित सराफ, डॉक्टर अशोक काबरा, मनीष काबरा, राजीव भन्साली, डॉक्टर गणेश मांटे , राजेश तायडे, श्याम गुजर आदी उपस्थित होते,