लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– केंद्र शासन संचालित कृषक भारती को. ऑपरेटिव्ह लिमीटेड (कृभको) च्या वतीने हॉटेल सिध्दार्थ येथे विक्रेता परीषद नुकतीच घेण्यात आली. या प्रसंगी खत व्यवस्थापन करतांना रासायनिक खतांचा शेतक-यांनी संतुलीत वापर करून जमिनितील सेंद्रिय कर्ब वाढवणे काळाची गरज आहे असे मोलाचे कृषी उपसंचालक चंद्रपूर चे श्री. चंद्रकांत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कटरे, मोहीम अधिकारी, जिल्हा परीषद कृषि विभाग चंद्रपूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, खत विक्री करतांना पॉस मशीन मधूनच शेतक-यांना विक्री करावी. जेणेकरून खतांचा ‘काळाबाजार होणार नाही असे सांगितले.
या प्रसंगी श्री. चव्हान, राज्य विपणन व्यवस्थापक, कृभको, मुंबई, श्री. सुर्यवंशी, विभागीय व्यवस्थापक, कृभको, नागपूर, श्री. चंद्रकांत ठाकरे, कृषि उपसंचालक, चंद्रपूर, श्री. बच्चुवार, जिल्हा पणन व्यवस्थापक, विदर्भ कॉ-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, चंद्रपूर, श्री. हजारे, जिल्हा पणन अधिकारी, चंद्रपूर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. पियुष नेमा, वरीष्ठ क्षेत्रीय प्रतिनिधी, कृभको, चंद्रपूर यांनी केले, कार्यक्रमाला जिल्हयातील ठोक व घाऊक विक्रेते मोठया संस्थेने उपस्थित होते.