लोकदर्शन कोरपना 👉 प्रा.अशोक डोईफोडे
कोरपना – एमिनेंस इंटरनेशनल स्कूल कोरपना येथे आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत विस्तृत माहिती सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांनी दीली. तसेच स्पर्धा परीक्षाचे युगात ग्रामीण भागातील मूल मागे राहु नये या हेतुने संस्कार प्रकाशन लातुर द्वारा ज्युनियर आय ए एस स्पर्धा परीक्षा २०२४ साठी शाळा, कॉन्व्हेन्ट च्या मुलांना परीक्षेत बसण्यास प्रवृत्त करुण दूसरी ते सातवी करिता शालेय अभ्यासक्रम वर आधारित स्टडी बुकसह, स्पर्धा परीक्षा साठी नोंदनी करुण प्राथमिक स्तरा पासून बेसिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यशाळेस एकशे पन्नास विध्यार्थीनी सहभाग घेतला.यावेळी प्राचार्य श्रीकांत लोडे,अमोल लोडे व शिक्षकवृदं उपस्थित होते.महाराष्ट्र तील बावीस जिल्हात ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरिल कोरपना तालुकयातील विद्यार्थ्यांसाठी संधी असुन पाचशे मुले प्रविष्ठ करण्याचा प्राचार्य ठावरी यांचा मानस असून त्यास उत्तम प्रतिसाद प्राप्त लाभत आहे. पालकानी लवकर नोदणी करन्याचे आवाहन त्यांनी केले आहे.