गडचिरोलीतील 75 गरजू विदयार्थ्यांना मिळाली सायकल

by : Shankar  Tadas

गडचिरोली : माऊली सेवा मित्र मंडळ आणि रोटरी क्लब द्वारे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्थ भागातील 75 गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल तसेच इतर 100 गरजू व्यक्तींना शेती स्प्रे पंप, स्मोकलेस शेगडीचे वाटप  करण्यात आले.

माऊली सेवा मित्र मंडळ आणि रोटरी क्लब द्वारे 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमीत्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नक्षलग्रस्त भागातील जे विद्यार्थी शिक्षणाकरिता ५ ते ७ किलोमिटर पायी जातात अश्या मुला मुलींना  75 सायकलींचे वाटप करण्यात आले.  बचतगटातील 100 महीलांना शेती फवारणी पंप, स्मोकलेस शेगडीचे वाटप केले. सेवाभावी संस्था व  गडचिरोली पोलिस दलाच्या अशा सेवाभावी  कार्यामुळे नक्षलवाद कमी होत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
अविंग्ना मुंबई,रोटरी क्लब साऊथ ईस्ट,माऊलीसेवा मीत्र मंडळ नागपूर व गडचिरोली पोलिस दल,रोटरी क्लब मुंबई यांनी या कार्यात हातभार लावला. या कार्याचे मार्गदर्शक श्री. प्रविण दिक्षीत माजी पोलिस महासंचालक असून सुहास खरे,राजीव वर्भे , मनोज चवरे ,सुरेंद्र खरे ,अनिल जोशी ,पोलिस अधिक्षक निलोत्पल  तसेच संपूर्ण गडचिरोली पोलिस दल  यांचे विशेष सहकार्य असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *