लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गोंडवांना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त 2 ऑक्टोंबर म.गांधी जयंती निमित्तआयोजित समारंभात डॉ.शरद बेलोरकर यांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरू श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार देवराव होळी, विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रा. डॉ. शरद बेलोरकर हे महाविद्यालयात गेल्या 17 वर्षापासून रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे. याआधी त्यांना चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून गोंडवाना विद्यापीठाने पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव केला होता. ते गेल्या तीन वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या रसेयो सल्लागार समिती सदस्य व तसेच चंद्रपूर जिल्हा रासैयो विभागीय समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.तसेच त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आव्हान शिबिरात गोंडवाना विद्यापीठाचे यशस्वी नेतृत्व केले आहे.डॉ. शरद बेलोरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक गावे दत्तक घेऊन विविध प्रकल्प व समाज उपयोगी कार्य केले असून शिबिराच्या माध्यमातून पल्स पोलिओ अभियान, रक्तदान शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर, साक्षरता अभियान ,जलसंधारण उपक्रम त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान यासारखे समाज उपयोगी कार्य शिबिराच्या माध्यमातून केले आहे
डॉ.शरद बेलोरकर यांच्या भरीव कामगिरीबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद अडबाले व सर्व संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, डॉ. हेमचंद दूधगवळी, डॉ. सुनील बीडवाईक,डॉ.संजय गोरे, डॉ. राजेश गायधनी, डॉ.माया मसराम, डॉ.सत्यन्द्र सिंह प्रा. मंगेश करंबे तथा मुख्य लिपिक श्री.शशांक नामेवार आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे