,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन नागपूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
३० सप्टेंबर २०२३ रोजी नारायणा विद्यालयम नागपूर येथे मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट यांच्या अध्यक्षतेखाली आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री. सिद्धार्थ कुलकर्णी , विदर्भ संघटक श्री. राजेश वाघ, कार्याध्यक्ष श्री. नरेन्द्र मोहिते यांनी आयोजीत केलेल्या नागपूर येथील पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
टिळक पत्रकार भवन नागपूर येथे नुकतीच पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. रेखा जगनाळे – मोतेवार यांची निवड झाल्याची घोषणा विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केली. या संमेलनाचे वैशिष्ठ्य म्हणजे याचे उद्घघाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब करणार आहेत, वर्धा येथील पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री हे स्वागताध्यक्ष पद भूषविणार असून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे तसेच ठाणे येथील आमदार संजयजी केळकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला जिल्हा शहर अध्यक्ष डॉ रमनिक लेनगुरे , शहर कार्याध्यक्ष निता चिकारे, आदी मान्यवर उपस्थीत होते. मराठी साहित्य मंडळाच्या कामात झोकून देण्याची क्षमता, प्रवृत्ती पाहून श्री नरेंद्र मोहीते यांना पूर्व विदर्भ विभाग प्रमुख तर श्री.प्रविण उपलेंचवार यांना विदर्भ प्रांतपाल म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर यांनी विदर्भ विभाग प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या शिफारसी नुसार बढती दिली. याचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मधे ९७ व्या मराठी साहित्य संमेलना चे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांना जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्कार , तसेच पंडित अग्निहोत्री यांना जीवन गौरव विद्या भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हे विशेष होय.
या संमेलनाची आणखी एक विशेष बाब म्हणजे या संमेलनाचे संमेलन गीत सौ.सुषमाताई मुलमुले यांनी लिहिले आहे जे सौ रसिका बावडेकर यांच्या मधुर आवाजात श्री मनीष उपाध्ये यांनी संगीतबद्ध केले आहे.
तरी सर्व साहित्य प्रेमींनी बहु संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे