लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर :– अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सकाळी ६ वाजता चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिर येथे दर्शन घेऊन, आरती करून जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. यानंतर गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, सेवादल काँग्रेसचे ध्वजारोहण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला माल्यार्पण, आझाद बगीचा, कामगार चौक, नेहरू चौक, बिनबा गेट, रहमत नगर ते नेहरू स्कुल पदयात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहरातील जनतेशी संवाद साधत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकार पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अत्याचारावर काँग्रेसने प्रहार करून जनजागृती केली. रस्त्या – रस्त्यावर, चौका – चौकात, वार्डातील नागरिकांना जनजागृतीपर पत्रके वाटून, कार्नर सभा घेवून जनतेशी थेट संवाद साधला. ठिक ठिकाणी या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी मोदी व शिंदे सरकार हे लोकशाही विरोधी असून यांच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्याय अत्याचार वाढत आहेत मात्र गेंड्याची कातडी धारण केलेले सत्ताधीश सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. फोडाफोडीचे राजकारण करून, ईडी, सीबीएसईचा गैरवापर करून दहशत माजवित आहेत. या लोकशाही विरोधी भाजप सरकारला जनता अवश्य धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुधाकर अडबाले यासह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनेक नेत्यांनी वर्तमान सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. या जनविरोधी भाजपचा पराभव करून आपला जनआक्रोश व्यक्त करण्याचे जनतेला आवाहन केले.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी अध्यक्ष सुभाषसिंग गौर, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके, जिल्हा प्रभारी मुजीब पठान, सह प्रभारी संजय महाकालकर, विनोद दत्तात्रेय, के. के. सिंग, अंबिकाप्रसाद दवे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, यूसूफ़भाई, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढ़िया, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, महेश मेंढे, प्रवीण पड़वेकर, प्रदेश ओबीसी काँग्रेसचे उमाकांत धांडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, सुधीर देवतडे, रुचित दवे, सूनिताताई अग्रवाल, बापू अंसारी, सकीना अंसारी, वीना खनके, कुणाल चहारे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राहुल चौधरी, सागर खोब्रागडे, मोणू रामटेके, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन शेख, विजय नळे, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, शालिनीताई भगत यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.