लोकदर्शन आटपाडी :👉राहुल खरात
श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी राष्ट्रीय सेवा
योजना विभाग व श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी येथे बुधवार दि. ३०/०८/२०२३ रोजी रक्षाबंधन
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे कार्यक्रमाचे
अध्यक्ष स्थानी होते. अध्यक्ष स्थानावरून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले की
रक्षाबंधन हा भारतातील प्रमुख सणापैकी एक सण आहे. हा सण श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा
केला जातो. रक्षाबंधनाचा हा सण भाऊ आणि बहिणीचे प्रेम या नातेसंबंधास समर्पित आहे त्यामुळे बहिण आणि
भावाचे नाते अतुलनीय आहे. परिणामी प्रत्येक भावाने आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी सदैव तयार रहावे
असे आवाहन केले प्रास्ताविक कार्यक्रम नियोजन समितीचे अध्यक्ष व भुगोल विषयाचे विभाग प्रमुख डॉ.
बाळासाहेब कदम यांनी केले. यावेळी ते म्हणाले बहिण व भावाचा पवित्र प्रेमाचा सण आहे यावेळी कार्यक्रमाचे
सुत्र संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती देशमुखे यांनी मांडले. या
कार्यक्रमासाठी डॉ. रामदास नाईकनवरे प्रा. आप्पा हातेकर, प्रा. जणू सुजित सपाटे, प्रा. अश्विनी भगत, प्रा. सारिका
घाडगे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.