by : Ajay Gayakwad
मालेगाव / वाशीम : मालेगांव तालुक्यातील विद्युत विषयी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून शेतातील विद्युत पोल गावठाण मधील ट्रान्सफॉर्मर व इतर समस्या या येत्या पंधरा दिवसात मार्गी लावाव्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख विलास जाधव यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला उपकार्यकारी अभियंता मालेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनातून हा इशारा देण्यात आला आहे तालुक्यात विद्युत भार नियमन बरोबर ट्रान्सफॉर्म जळणे विद्युत दाब वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे या शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल गावठाण मध्ये ट्रान्सफॉर्मर व इतर अनेक समस्यांनी शेतकरी बांधव व सर्व नागरिकत त्रस्त झाले असताना शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता शिवसेना तालुकाप्रमुख विलास जाधव यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांनी १७ ऑगस्ट रोजी महावितरण विभागाच्या कार्यालयात धडक दिली तर यावेळी त्यांनीउपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले या निवेदनात तालुक्यात अनेक वर्षापासून गावठाण विद्युत ट्रान्सफॉर्म व शेतातील ट्रान्सफॉर्म मधील आवश्यक असलेले फ्युज तारा व इतर महत्त्वाची उपकरणे नाहीत अनेक ठिकाणी शेतात विद्युत पोल वाकलेले असून विद्युत पोल तारासह पडण्याची शक्यता असून अपघात होण्याची शक्यता आहे अशा एक नाही अनेक समस्या असताना मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत विषयी समस्या हया येत्या पंधरा दिवसाच्या आत सोडवाव्या अन्यथा आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन केल्या जाणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे उपकार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग मालेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विलास जाधव यांच्या सोबत युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे नगरपंचायत चे माजी सभापती चंद्रकांत जाधव शिवसेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे, गजानन केंद्रे सर्कल प्रमुख पंडितराव घुगे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विलास जाधव यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी मागणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.