by : Shankar Tadas
चंद्रपूर : सध्याच्या पिढीला रानभाज्यांची माहिती व गोडी लागावी याकरिता रानभाज्या महोत्सवाचे आयोजन भद्रावती व वरोरा येथे करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन पार पडले.
याप्रसंगी भद्रावती येथे न. प. चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती पंचायत समिती माजी सभापती प्रवीण ठेंगणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी अधिकारी यु बी झाडे, मंडळ कृषी अधिकारी व्ही जे चवले, दत्तात्रय गुंडावार, पी एम ठेंगणे, व्हि बी कवाडे, पांडुरंग सरवदे, एम एन ताजने, एच एल इददे, सुधीर हिवसे, मोहिनी जाधव, अनिल भोई तसेच वरोरा येथे माजी जि प सदस्य सुनंदाताई जीवतोडे, वरोरा तालुका कृषी अधिकारी तथा उपपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, डॉ सुहास पोतदार, भानुदासजी बोधाने यांची उपस्थिती होती.
महोत्सवात विविध रानभाज्या व पौष्टिक भरडधान्ये तसेच रानभाज्या व भरडधान्यांची विविध व्यंजने, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या नवउद्योजकांना उत्पादने प्रदर्शनी व विक्रीकरिता उपलब्ध होते. उत्तम आरोग्याकरिता रानभाज्या व भरडधान्ये उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून केले. रानभाजी महोत्सव चे महत्व व विविध रानभाज्यांचे उपयोग तसेच अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याविषयी तालुका कृषि अधिकारी सुशांत लव्हटे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास पोतदार यांनी कृषि महाविद्यालयाची शेतकऱ्यांविषयी भूमिका स्पष्ट केली तसेच कांचणी शेतकरी उत्पादक कंपनीची शेतकऱ्यांविषयी भूमिका यशवंतजी सायरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय काळे मंडळ कृषि अधिकारी शेगाव यांनी केले. महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली व रानभाज्यांची खरेदी केली.