लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात
सांगली दि.११/०८/२०२३
आदरणीय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित शोषित श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी तसेच कामगारांच्या आडी – अडचणी कायम उभी राहणारी एकमेव कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने नोंदणीकृत सुतार कामगार (अल्युमिनियम विंडोज कामगार) चंद्रकांत भिमराव कांबळे यांना तोंडाचा कॅन्सर हा गंभीर आजार झाला होता. घरचा कर्ता – सवर्ता प्रमुख व्यक्ती हा कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त झाले असल्याने घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा तसेच पत्नी आणि आई वडील असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची जाणीव ठेवून ते आजारी असताना देखील ते कसेबसे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोठ्या दोन मुली उच्च शिक्षण घेत आहेत बाकी दोन मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. तसेच त्यांचा स्व:ताचा औषध उपचार सुरू असल्याने तो मोठा खर्च आहे. यामुळे त्यांना बाहेरून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेऊन या सर्व बाबींवर नियोजन करावे लागत आहे. हि बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो सांगली यांची प्रत्येक्षात भेट घेऊन नोंदणीकृत असणारे सुतार कामगार चंद्रकांत भिमराव कांबळे यांना झालेला गंभीर आजार तसेच ऑपरेशन नंतर पुढील उपचारासाठी होत असणारी आर्थिक अडचणी याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच मुलांचे शैक्षणिक होत असलेले नुकसान या बाबतीत चर्चा करून गंभीर आजाराने त्रस्त असणारे सुतार कामगार चंद्रकांत भिमराव कांबळे यांना मंडळाने आखून दिलेल्या धोरणानुसार औषध उपचार करण्यासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करावे अशी विनंती केली होती. त्या विनंती नुसार, मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो यांनी नोंदणीकृत सुतार कामगार यांच्या गंभीर आजार व त्यांच्या कुटुंबीयांचे होत असल्याचे हाल उपेक्षा लक्षात घेऊन तत्काळ एक लाख रुपये आर्थिक साहाय्य हे गंभीर आजाराने त्रस्त असणारे कामगार चंद्रकांत भिमराव कांबळे यांच्या बौंक खात्यावर जमा केले आहे. यामुळे ते वेळेवर त्यांच्या औषध उपचार करण्यासाठी पैसे उपयोगी पडले. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त मा. मुज्जमिल मुजावर साहेब यांनी सांगली जिल्ह्यात आपला कामा चार्ज घेतल्यानंतर श्रमिक कष्टकरी तळागाळातील खरे बांधकाम कामगारांना शासनाने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचे लाभ तात्काळ मिळावेत म्हणून अनेक उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतुक म्हणून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळाने गंभीर आजाराने त्रस्त असणारे सुतार कामगार चंद्रकांत भिमराव कांबळे यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन,मा. सहाय्यक कामगार आयुक्त सो सांगली यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, चंद्रकांत कांबळे, जगदिश कांबळे, शिवकुमार वाली, बंदेनवाज राजरतन, प्रदिप मंनचद, ऋषिकेश माने, किशोर आढाव, संगाप्पा शिंदे आदी उपस्थित होते.