लोकदर्शन. विटा 👉 राहुल खरात
विटा दि . १० जुलै.
जीवनात *इन्सानियत* ला सर्वोच्य प्राधान्य दिल्यास आपले विश्व सुंदर बनवाल . अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
खानापूर तालुक्यातील मुस्लीम बंधु – भगिनींशी सुसंवाद साधताना सादिक खाटीक यांनी आपली भूमिका विषद केली . रहिम राजकादरी यांच्या ऑफिसमध्ये ही बैठक संपन्न झाली .
मुस्लीमांनी लाजरे बुजरेपणा, न्यूनगंड, भीती वगैरे प्रगतीला मारक अनेक गोष्टीचा त्याग करून सर्वच प्रकारचे शिक्षण आत्मसात करण्यासाठी सर्वोच्य प्राधान्य दिले पाहीजे . कोणत्याही जाती धर्माच्या, रावा पासून रंकापर्यतच्या माता, भगिनी, बांधवांचे रक्त, भिन्न जात, धर्माच्या सर्वांना चालत असेल तर मानवताच सर्वश्रेष्ट ठरते, हेच अधोरेखित होत असल्याने प्रत्येकाने आपल्या अवती भवतीच्या सर्वांनाच आपले मानले पाहीजे . त्यांच्याशी सुसंवादाने राहीले पाहीजे, हेच सर्वांच्या भल्याचे असेल, असे ही सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
खानापूर तालुक्याचे मुस्लीम समाजाचे नव्या पीढीचे आश्वासक नेतृत्व मोहसीन मुजावर (नागेवाडी ) , रोजगार स्वयंरोजगार विभाग खानापूर तालुक्याच्या अध्यक्षा कु . पाकीजा सुरज शिकलगार ( चिखलहोळ ) , अग्रणी सोशल फौंडेशनच्या संचालिक सौ . करीना मुल्ला ( नेवरी ), शकीलभाई तांबोळी ( माहुली ) , रहिम राजकादरी, सद्दाम पटेल, इरफान राजकादरी,अमीर मुलाणी ( विटा ), मोहसीन शिकलगार ( घानवड ), आटपाडीचे अभियंता असिफ कलाल, असिफ उर्फ बाबू खाटीक, असिफ कुरेशी इत्यादी अनेकांनी या दीर्घ बैठकीत सहभाग दर्शविला व मते मांडली .
मुस्लीम समाजाची सद्यस्थिती, शिक्षण, व्यापार,व्यवसाय, उद्योग, शेती, समाजकारण, राजकारण इत्यादी अनेक बाबींवर प्रदिर्घ उहापोह करण्यात आला . सर्वच बाजुनी उपेक्षा झालेल्या मुस्लीमांची सदयस्थिती बद से बत्तर अशा दारुण मागासलेपणाची असल्याबाबत आणि या स्थितीला मुस्लीमच सर्वथा जबाबदार असल्याबाबत सर्वांचे एकमत झाले . स्वातंत्र्य प्राप्तीपर्यत सर्वच बाजुंनी संपन्न असणाऱ्या मुस्लीमांची ७२ वर्षात मोठी अधोगती झाल्याचे तसेच मुस्लीम मागासांना एस . सी ., एस . टी .आरक्षणात समावेशासह विशेष आरक्षण देवून उभे करणे न्यायाचे होणार आहे . उद्योग, व्यवसायांना जागा, व्यवसायाला दीर्घ मुदतीची अल्प व्याज दराची कर्जे उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने घ्यावे. बांबु लागवड, सेंद्रिय भाजीपाला लागवड, दुग्धव्यवसाय, शेळी पालन, सौर उर्जा अशा विविध शेती पुरक व्यवसायांवरही यावेळी चर्चा करण्यात आली . एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. वगैरे स्पर्धा परिक्षांसाठी समृद्ध ग्रंथालय युक्त अभ्यासिका आणि बार्डी, सारथी, महाज्योती वगैरेच्या धर्तीवर विस्तृत संशोधन केंद्राबाबत भूमिका विषद करण्यात आली . प्रत्येक कुटुंबात बचतीचे कुलुपबंद डब्बे देवून वर्षाकाठी जमा होणाऱ्या लाखो रुपयांमधून अनेक बाबी साकारल्या जावू शकतील यावर ही चर्चा केली गेली .