L
लोकदर्शन.तालुका प्रतिनिधी👉मनोज गोरे
कोरपना : कोणतेही खत किंवा कीटकनाशक फवारणी न करता उत्पन्न होणाऱ्या रानभाजीचे महत्व लक्षात घेता रानभाज्यांविषयी ओळख व माहिती व्हावी, आहारात त्याचा उपयोग व्हावा, याकरिता कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्यावतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन ११ ऑगस्ट रोजी कोरपना तहसील कार्यालय येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात तालुक्यातील शेतकरी, शेतकरी बचतगट यांना रानभाजी विक्री करता येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी रानभाज्या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी. डी. ठाकूर यांनी केले आहे.