लोकदर्शन 👉 जागृती भाट
छात्रशक्ती संस्था गेली सात वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक काम करत आहे. तळागळातील गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध रचनात्मक उपक्रम राबविले जातात. संस्थेचे संस्थापक किशोरदादा जगताप यांनी जे विद्यार्थी आपल्या आर्थिक परिस्थिति अभावी शिक्षणबाह्य झालेले आहेत तसेच अभ्यासाच्या भीतीपोटी शाळा सोडणाऱ्या, व्यसनाधीन झालेल्या विद्यार्थ्यांना खेळाच्या आणि गाण्याच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. असे चिरंजीवी संघटनेचे अध्यक्ष सालोनी तोडकरी यांनी सांगितले.
हिरोशिमा नागासाकी वर 6 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्यानंतर ही जपान सारखा देश शिक्षणाच्या साहाय्याने पुन्हा उभा राहिला. ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ह्या संकल्पनेला घेऊन मागील वर्षी 6 ऑगस्ट 2022 रोजी जन्मतः सक्षमच असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा गणाई ह्यांनी त्यांच्या कल्याण येथील मैत्रकूल जीवन विकास केंद्रापासून,डोंबिवली, ठाणे,नवी मुंबई ते मुंबई च्या गल्यागल्यांमधून शिक्षणाचा प्रचार-प्रसार ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ची घोषणा करत,भर पावसात कुलाबा पर्यंतचा पल्ला गाठला.असे चिरंजीवी संघटनेचे राज्य कार्यवाह राहुल भाट यांनी सांगितले.
या संकल्पनेला 6 ऑगस्ट 2023 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने संस्थेअंतर्गत ‘युद्ध नको शिक्षण हवं’ हि रॅली काढण्यात आली होती . आपल्या विरार विभागात वा. वी. ठाकूर विद्यालय (चंदनसार) ते साने गुरुजी बालउद्यानापर्यंत ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. . रॅली चे उद्धघाटन कार्यक्रमा मध्ये माजी नगरसेवक विनय पाटील, छात्रशक्ती संस्थेचे संस्थापक किशोर गणाई , मराठी भारतीच्या राज्यध्यक्षा ऍड. पूजा बडेकर ताई, कार्यवाह अनिल हाटे दादा, छात्रशक्ती चे MD. सचिन सुतार दादा उपस्थित होते असे झपुर्झा चे व्यवस्थापक चेतन कांबळे यांनी सांगितले.
रॅली दरम्यान संपूर्ण विभागात लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले. शिक्षणाचा प्रचार प्रसार करनारे फ्लॅश कार्ड घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. रॅली चा समारोप उप आयुक्त पंकज पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी देखील आपल्या युद्ध नको शिक्षण हवं या रॅली ला सदिच्छा दिल्या. असे झपुर्झा च्या कार्यकर्त्या प्रगती कांबळे ह्यांनी सांगितले.