लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी (ता. प्र ) :– आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. मौजा अडेगाव, वढोली, दरूर, पारगाव, व नदी काठच्या परिसरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
या प्रसंगी आ धोटे यांनी ग्रामस्थांकडून अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे, पांदण रस्त्याच्या अडचणी, घरांची पडझड आदी समस्यांचे गाऱ्हाणे नागरिकांनी आमदारांपुढे कथन केले. यावेळी आमदारांनी समंधीत अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे निर्देश देत मी स्वतः लक्ष घालणार तुमच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. सोबतच मौजा चेकविठ्ठलवाडा येथील योगिता प्रशांत खोब्रागडे यांचा दि. २५ जुलै २०२३ ला शेतात काम करीत असतांना वीज पडून मृत्यू झाला. त्यांचे पती प्रशांत कचरूजी खोब्रागडे व दोन मुले यांना आ. धोटे यांच्या हस्ते ४ लक्ष रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मौजा चेकबापूर (सकमुर) येथील शेतकरी विलास मोडया जल्लावार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी श्रीमती छाया विलास जल्लावार यांना १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मौजा चिवंडा येथील शेतकरी गोविंदा लिंगा टेकम यांचा दि. २६ जुलै २०२३ ला वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई गोविंदा टेकाम यांना ४ लक्ष रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मागील महिन्यात आलेल्या पुरात दिवाकर कोहपरे या शेतकऱ्याचे दोन बैल पाण्यात वाहून गेले. त्यांना यावेळी ५७ हजारांचा मदतीचा चेक देण्यात आला. नुकसानीचे पंचनामे योग्य करा शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी प्राथमिक याद्या ग्रामपंचायत बाहेर लावावे असे निर्देश दिले.
या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, तलाठी लोणकर, ग्रामसेवक देवराव कोडापे, गोंडपीपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, कार्याध्यक्ष तथा कृ बा स संचालक निलेश संगमवार, शहराध्यक्ष देवेन्द्र बट्टे, उपाध्यक्ष नितेश मेश्राम, सरपंच रमेश बारसागडे संचालक अशोक रेचनकर, माजी संचालक शंभू येलेकर, यु. काँ अध्यक्ष संतोष बंडावार, अनिल कोरडे यशवंत अलोने पोलिस पाटील चेक विठ्ठलवाडा, कचरू खोब्रागडे, मौजा अडेगाव येथील रेखा चौधरी सरपंच, शालीक झाडे, पुरुषोत्तम रेचनकार, विजय चौधरी, संजय धुडसे, अल्का नागापूर, सोनी उंबरकर, संतोष कोवे, दामोदर राऊत, मौजा चिवंडा येथील संतोष कोवे सरपंच, सुनिता आत्राम, आशा आत्राम पोलीस पाटील, दिपक पेंदोर, विठ्ठल सोयाम, विनोद टेकाम यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.