,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा
अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे जी 20 युवा संवाद अंतर्गत ‘जंगल संपत्तीचे संवर्धन काळाची गरज’ या विषयावर दिनांक 26 जुलै 2023 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले गेले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे प्रा. सचिन कणॅवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आशिष पईनकर यांनी जंगल संवर्धन ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जंगलांचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला व मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन कणॅवार तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे, संतोष चौधरी, ननिता बुरान, शालिक कांबळे, प्रशांत नवले, सविन मडावी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
,