युद्ध नको शिक्षण हवं” संकल्पनेची वारी येत्या 6 या ऑगस्ट रोजी विरार मध्ये.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

छात्रशक्ती संस्था गेली सात वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक काम करत आहे. तळागळातील गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध रचनात्मक उपक्रम राबविले जातात. संस्थेचे संस्थापक किशोरदादा जगताप यांनी जे विद्यार्थी आपल्या आर्थिक परिस्थितिअभावी शिक्षणबाह्य झालेले आहेत तसेच अभ्यासाच्या भीतीपोटी शाळा सोडणाऱ्या, व्यसनाधीन झालेल्या विद्यार्थ्यांना खेळाच्या आणि गाणाच्या माध्यमातून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. असे छात्रशक्ती व्यवस्थापक सचिन सुतार यांनी सांगितले.
हिरोशिमा नागासाकी वर 6 ऑगस्ट रोजी झालेल्या हल्यानंतर ही जपान सारखा देश शिक्षणाच्या साहाय्याने पुन्हा उभा राहिला. ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ह्या संकल्पनेला घेऊन मागील वर्षी 6 ऑगस्ट 2022 रोजी जन्मतः सक्षमच असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर दादा गणाई ह्यांनी त्यांच्या कल्याण येथील मैत्रकूल जीवन विकास केंद्रापासून,डोंबिवली, ठाणे,नवी मुंबई ते मुंबई च्या गल्यागल्यांमधून शिक्षणाचा प्रचार-प्रसार ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ची घोषणा करत,भर पावसात कुलाबा पर्यंतचा पल्ला गाठला.असे चिरंजीवी संघटनेच्या अध्यक्षा सालोनी तोडकरी यांनी सांगितले.
या संकल्पनेला 6 ऑगस्ट 2023 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने संस्थेअंतर्गत ‘युद्ध नको शिक्षण हवं’ ह्या रॅलीचे आयोजन करत आहोत. आपल्या विरार विभागात पाचपायरी ते साने गुरुजी बालउद्यानापर्यंत ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाचा प्रचार प्रसार करनारे फ्लॅश कार्ड घेऊन विद्यार्थी रॅलीचा भाग होणार आहेत.असे चिरंजीवी संघटनेचे संपर्क अधिकारी चेतन कांबळे यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थ्यांनी ह्या संकल्पनेचा भाग होऊन त्यातील गांभीर्य आणि काळाची गरज समजून घेत पाठिंबा द्यावा. असे आव्हान विद्यार्थी भारती च्या कार्यकर्त्या जागृती भाट ह्यांनी केले आहे..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *