गडचांदूर येथील शिबिरात 101 युवकांचे रक्तदान

by : Manoj Gore

कोरपणा :  गडचांदूर येथे आज मा. वने सांस्कृतिक मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी महिलांनी सुद्धा रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 101 युवकांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना राजुरा विधानसभेचे माजी आमदार संजय भाऊ धोटे यांनी शिबिराला भेट दिली यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याचे पदाधिकारी महादेव एकरे, शिवाजी शेलूरकर, सतीश उपलेचवार, निलेश ताजने, रामसेवक मोरे, नारायणजी हिवरकर, हरिभाऊ घोरे,अरुणजी डोहे, दिनेश खडसे, ओम पवार, नैनेश आत्राम, आशिष ताजने, अरुण मळावी, विजय रणदिवे, प्रमोद पायगन, अमोल आसेकर, मनोहर चव्हाण, महेश घरोडे, शंकर आपुलकर, योगेंद्र केवट, धर्मा वाघमारे, युवा मोर्चाचे पदाधिकारी ही उपस्थित होते धवल घोरे अजीम बेग प्रतीक संदनवार, इमरान पाशा, विकी मेकावर, कुणाल पारखी राधेश्याम चुटे, गणेश कवलवार, अक्षय मेंढी, राहुल चूरे, शंकर अपुलकर, आकाश बोनगिनवार, रवी बंडीवार, आदींची प्रामुख्याने उपस्थित होती वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here