संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानच्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण यांची निवड

by : Shankar Tadas
गडचांदूर : संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान च्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. करकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र पवार तर सचिवपदी उत्तम जाधव सर यांची निवड करण्यात आली आहे.
1) श्री.हितेश आबाजी चव्हाण अध्यक्ष
2) श्री.रामचंद्र मोतीराम पवार उपाध्यक्ष
3) श्री.उत्तम जाधव सचिव
4) श्री.अशोक बळीराम जाधव सहसचिव
5) श्री.कनिराम पवार कोषाध्यक्ष
6) श्री.माधव पवार सदस्य
7) श्री. वामन बालाजी जाधव सदस्य
8) श्री. कैलास पवार सदस्य
9) श्री.गणेश करमटोट सदस्य
10) श्री.संतोष तुळशीराम राठोड सदस्य
11) श्री. देविदास नंदू पवार सदस्य
12) श्री.सुभाष जाधव सदस्य
13)श्री.दिलीप राठोड सदस्य
14) श्री.विजय चव्हाण सदस्य
15) श्री. शिवाजी राठोड सदस्य
16)श्री.शंकर राठोड सदस्य
17) श्री.रामसिंग पवार सदस्य

गडचांदूर येथील गोपाल मालपाणी सेलिब्रेशन हॉलमध्ये आयोजित बंजारा समाजाच्या सभेत ही कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख श्री. अण्णाराव आडे होते. या सभेत खालील विषयावर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
1) समिती गठीत करणे
2) सभेत अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव/सहसचिव/कोषाध्यक्ष यांची निवड सर्वानुमते मंजूर .करण्यात आले.
3) आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार
अध्यक्ष/सचिव/कोषध्यक्ष संयुक्त राहील असे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
4) समाज संस्थानाला नाव देण्याबाबत
1- क्रांतिकारी सेवालाल गोर बंजारा समाज संस्थान गडचांदूर
2- संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान गडचांदूर
3- सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज सेवा संस्थान गडचांदूर अशा प्रकारे तीन नावे दर्शविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री.गणेश राठोड (करमटोट), प्रास्ताविक
श्री.विनोद चव्हाण तर श्री.बंडू राठोड सरांनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here