अंगनवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्त लाभांश देण्यात यावा : आमदार सुभाष धोटेंची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधिमंडळात मागणी

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर :👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र विधानसभा सभागृहात औचित्याचा मुद्दा राजुरा मतदारसंघातील आमदार श्री.सुभाष धोटे यांनी उपस्थित करतांना सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील जवळपास ४५० ते ५०० अंगनवाडी सेविका व मदतनीस मानधनी पदावर काम करीत असताना त्यांचे वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झालेल्या आहेत. महीला व बाल विकास सेवा योजना विभागाकडून अजुनही सदरहू सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीचा लाभांश देण्यात आलेला नसल्याने आर्थिकदृष्ट्या त्यांची ससेहोलपट होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला..
ते सभागृहात बोलताना पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचार्यांना जवळपास पाच वर्षाचा कालावधी पुर्ण होऊनही सेवा निवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याने वृद्ध सेवानिवृत्त महिला कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत परंतु शासन निष्क्रिय आहे. वृद्धापकाळात त्यांचेवर व कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. यातील अनेक सेवानिवृत्त महिला कर्मचारी मयत सुद्धा झालेले आहेत. त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचा लाभ मिळणेबाबतचा प्रस्ताव आयुक्त महिला व बालकल्याण यांचे कार्यालयाकडे प्रलंबित असून शासनाने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यावी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ते निर्देश दिले जावेत.अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *