उमेद’च्या मोर्चाकरिता कोरपना टीम आझाद मैदानावर

by : Shankar Tadas
कोरपना : विविध मागण्या मान्य करण्यासाठी उमेद योजनेच्या कार्यकर्त्याचा मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानावर 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चात सहभागी होण्याकरिता कोरपना तालुक्यातून टीम पोहोचली आहे.
उमेदच्या कार्यकर्त्यानी केलेल्या मागण्यानुसार त्यांना 30 दिवसाचे मासिक मानधन द्यावे, दर दहा तारखेला मानधन मिळावे, मानधनात 50 % वाढ करावी, शासकीय सेवेत घ्यावे, कोविड काळात वेतनवाढ याकरिता हा मोर्चा होत आहे. यात राज्यातून हजारोच्या संख्येने समूह संसाधन व्यक्ती सहभागी होत आहेत, अशी माहिती बोरी नवेगाव येथील ICRP कल्पना अवताडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here