पुर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या, अवैध कोळसा तस्करांवर आडा घाला. ♦️आमदार सुभाष धोटेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे
दिनांक २३ जुलै, २०२३ रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गोळीबार करून सौ. पुर्वशा सचिन डोहे या निरागस महिलेची हत्या केली. यामुळे दोन निरागस लहान बालके पोरखी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असल्याने राजुरा, गडचांदूर ते कोरपना पर्यंत व बल्लारपूर, चंद्रपूर पर्यंत अवैधरीत्या कोळशा तस्करी सुरु असतात. या कोळशाच्या अवैद्य व्यवसायामधून अनेक गंभीर गुन्हे घडत असतात. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे व समाजामध्ये भितीचे वातावरण पसरविणा-याऱ्यांचे मनोबल वाढत असून यामुळेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप स्त्रीचा बळी गेला आहे. या घटनेतील आरोपसह अन्य सर्व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी, तसेच यापूर्वी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात अश्याच प्रकारच्या निंदनीय घटना घडलेल्या असताना सुद्धा त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे ही घटणा घडली असे जाणकारांचे मत आहे. या संदर्भात दुर्देवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन कठोर कर्यवाही करून अशा घटना भविष्यात घडु नयेत याबाबत कठोर कार्यवाही करुन कार्यवाही बाबतचा अहवाल कळवावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तथा विधीमंडळाच्या कामकाजातही केली आहे. आता राजुरा आणि परिसरातील अशा गुंडांवर कठोरात कठोर कारवाईची अपेक्षा निर्माण झाली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *