लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २१जुलै
दिनांक १०/०७/२०२३ रोजी श्री. घनश्याम जयवंत पाटील, वय ४८ वर्षे, व्यवसाय- पोलीस पाटील, राहणार ठिकाण- सारडेगांव, पोष्ट वशेणी, तालुका-उरण, जिल्हा-रायगड यांना मौजे सारडे गावचे शिवारास सर्वे जवळ पिरकोन सारडेगाव रोडचे कडेला एक लाल रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी उरण पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने उरण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १५२ / २०२३, भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटनास्थळी पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, परि.२, पनवेल, धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग, गजानन राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई, सतिश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे, सुर्यकांत कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनुरुद्ध गिजे सहा पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्यानंतर उरण पोलीस ठाणेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अनोळखी महिलेची ओळख पटवुन आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे एक मोठे आवाहन होते.
त्याप्रमाणे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) व स्टाफ यांनी महिलेची व आजुबाजूच्या परिसराची सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेवुन तपासाला गती दिली त्यामध्ये सदरची महिला डोंबिवली, ठाणे येथील असल्याची माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील विजय पवार व पथक डोंबिवली येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या अधारे तपास करून अनोळखी मयत महिला हिची ओळख पटविण्यात यशस्वी झाले व तेथुन सदर गुन्हयाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.
डोबिवली येथे सदर महिलेच्या घराशेजारी व्यक्तींकडे चौकशी करता मयत महिला हिला तीचा पोयनाड, अलिबाग येथील जावई याचा फोन आल्यानंतर मुलीला भेटण्याकरीता त्या दिनांक ०९/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५:०० वा. घरून निघाल्या असल्याबाबत माहिती मिळाली त्यामुळे जावई याने सदर मयत महिलेस बोलावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर जावयाचा पोयनाड, अलिबाग येथे जावुन शोध घेताना जावई नामे मयुरेश अजित गंभीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन सध्या तडीपार करण्यात आलेला आहे असे समजल्याने उरण पोलीसांनी गुन्हे प्रकटीकरणाची सर्व यंत्रणा, त्याची व त्याच्या सहकाऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी तत्परतेने कामाला लागली. तेव्हा तो ठाणे जिल्हयातील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील पालावा, खोणी, डोबिवली (पूर्व) येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा पोलीस ठाणे व स्टाफ तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे व स्टाफ यांची मदत घेवुन छापा टाकला असता संशयीत आरोपी मयुरेश अजित गंभीर व त्याचा साथिदार दिलीप अशोक गुंजलेकर हे मिळुन आल्याने त्यांचेकडे सदर अनोळखी महिलेबाबत सखोल चौकशी करता त्यांनी व त्यांचे आणखीन दोन साथीदार यांनी मिळून कट रचुन सदर मयत महिलेस तीच्या मुलीस भेटण्याच्या निमित्ताने बोलावुन शिळफाटा, ठाणे येथुन इन्होवा कारमध्ये घेवुन तीस कळंबोली, पळस्पे, खारपाडा मार्गे चिरनेर मार्गावर आल्याने साई गावचे खिंडीमध्ये आल्यानंतर मयत महिलेच्या डोक्यात आरोपीकडे असलेल्या पिस्टलने दोन गोळ्या झाडुन तीस गंभीर जखमी केले व तेथुन मौजे सारडे गावचे हद्दीत आल्यानंतर जखमी महिलेस गाडीतुन खाली फेकुन तीचे मानेवर धारधार सुऱ्याने वार करुन ती मयत झाली याची खात्री झाल्यानंतर तेथुन गाडीसह पळून गेले.असे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांची दिनांक १८/०७/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
सदर रिमांड मुदतीत आरोपीतांकडे सखोल चौकशी करता आरोपी नामे मयुरेश अजित गंभीर याने त्याची दुसरी पत्नी प्रिती मयुरेश गंभीर हिस ऑगस्ट २०२२ मध्ये अलिबाग येथील साज व्हिला, वाळंज परोडा, नागाव या हॉटेलवर वर्षा विहाराच्या बहाण्याने घेवुन जावुन तीचा गळा दाबून खुन केला व आरोपी दिलीप अशोक गुंजलेकर, दिपक उर्फ बाबु बजरंग निशाद व अबरार अन्वर शेख तसेच त्यांचे साथीदार यांनी प्रिती हिचा मृतदेह धरंमतरखाडी, वडखळ, ता. अलिबाग यामध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याचे त्यांनी कबुली दिली आहे.
अशाप्रकारे उरण पोलीस ठाणे हद्दीत मौजे सारडेगाव शिवारात मिळालेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा तसेच तीची मुलगी प्रिती हिचे खुनाचा गुन्हा ११ महिन्यानंतर असे दुहेरी हत्याकांडाचे गुन्हे कोणताही सुगावा नसताना उरण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवुन १६ तासात उघडकीस आणण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरी ही मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, संजय मोहिते सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई, पंकज डहाणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पनवेल, धनाजी क्षीरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस ठाणे, सुर्यकांत कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पवार सहा पोलीस निरीक्षक, (गुन्हे प्रकटीकरण), चंद्रहार पाटील पोलीस उप निरीक्षक, (गुन्हे प्रकटीकरण) अनुरुध्द गिजे सहा पोलीस निरीक्षक, पोहवा / बलदेव अधिकारी, पोहवा / शशिकांत घरत, पोहवा / घनशाम पाटील, पोहवा / नितीन गायकवाड, पोहवा / कुणाल म्हात्रे, पोहवा / रुपेश पाटील, पोहवा /सचिन बोठे, पोहवा / धनाजी गावंड, पोहवा / प्रविण पाटील, पोना / दिगंबर नागे, पोना / मच्छिद्र कोळी, पोशि/ सचिन ‘, माळशिकारे, पोशि/ प्रमोद कोकाटे, पोशि/ रोहित गावडे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदर सर्व माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.