लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– मणिपूर येथे मागच्या चार महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारा मधेच 4 मे ला महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. समाज माध्यमातून आणि खाजगी वाहिन्यांवर हा व्हिडिओ प्रसारित झाला. यातून ही माहिती समोर आली की, सदर घटना 4 मे ची आहे. पीडित महिलांनी पोलीस स्टेशन गाठून सदर घटनेची तक्रार दाखल केली. तरी सुद्धा मणिपूर सरकार कडून तत्काळ कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर घटना लोकशाही देशाला शरमेने मान खाली घालणारी आहे. त्यामुळे घटनेची तात्काळ चौकशी होऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी तसेच मणिपूर आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संविधान चौक राजुरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राजुरा महिला कॉग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ. उ. बा. समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, धनराज चिंचोलकर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी जि. प. सदस्य मेघा नलगे, माजी सभापती कुंदा जेणेकर, रेखा आकनुरवार, प्रतिमा मडावी, अंजली गुंडावार, सुमित्रा कुचनकर, नंदा गेडाम, इंदु निकोडे, निता बानकर, कामिनी उईके, वनिता मून, कविता मोरे, किरण वाघमारे, सारिका शेंडे, पुष्पा ढोले, अश्विनी बोबडे, शोभा बोबडे, सुशीला संदुरकर, शुभांगी सिडाम, गोपीका आत्राम, मनिषा देवाळकर, भावना मडावी, सुनिता सातपुते यासह महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.