लोकदर्शन गड़चांदुर..👉 प्रा.अशोक डोईफोडे
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, मुंबई तर्फे दिला जाणारा सर्वकृष्ट औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पुरस्कार, नागपूर विभातून, अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचांदूर, ला सन 2020 -21 करीता जागतीक युवा कौशल्य दिनी मुंबई इथे , श्री मंगलप्रभातजी लोढा, मंत्री कौशल्य तथा उधोजता मंत्रालय महाराष्ट्र राज्य , व अवर मुख्य साचिव श्री आशिष कुमार सिहं, सचिव मा. श्री रामास्वामी साहेब, मा. श्री दिगंबर दळवी,संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांचे शुभ हस्ते दिनांक 15 जुलै ला मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार उत्कृष्ट कौशल्य प्रशिक्षण, नावीन्य पूर्ण उपक्रम, उकृष्ठ प्रशिक्षण सुविधा, विविध उद्योगासोबत भागीदारी, याकरिता प्रदान करण्यात आला आहेत
सदर पुरस्कार विभागीय संचालक श्री पी टी देवतळे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी चंद्रपूर, अंबुजा सिमेंट फाउंडेशन, व अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चा स्टाफ यांच्या सहकार्याने मीळाल्याचे मत प्राचार्य श्री प्रमोद खडसे यांनी व्यक्त केले. तसेच अंबुजा फॉउंडेशन च्या वतीने संचालनालय चे आभार व्यक्त केले.